वस्त्रोद्योग धोरण..
वस्त्रोद्योग धोरण 2018 ते 23 : देशाचा पश्चिम व मध्य भाग व्यापलेल्या महाराष्ट्र राज्याला अरबी समुद्राचा 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा नैसर्गिक कानापासून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड गडचिरोली गायखुरी या डोंगररांगा राज्याचा नैसर्गिक सीमा आहेत. राज्याला वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक व गोवा या राज्यातही वेढले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून जनगणना 2011 नु सार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी असून ती देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे राज्याचे भौगोलिक क्षेत्र 3.0 आठ लक्ष चौरस किलोमीटर आहे. राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45 पॉईंट दोन टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते मुंबई महाराष्ट्राची राजधानी भारताची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्य कार्यालये ह्या शहरात आहेत. देशातील प्रमुख शेअर बाजार व भांडवली बाजार आणि विक्री वस्तू विनिमय केंद्रे मुंबईत आहेत तर राज्य 36 जिल्हे असून ती मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसूल विभागात विभागले आहे. शेती हा महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. राज्यात अन्नधान्याची व नगदी अशी दोन्ही पिके घेतली जातात. चांगल्या प्रकारे विकसित पायाभूत सुविधा मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती सर्व प्रमुख विभागांत भागांशी दळणवळण कुशल मनुष्यबळ आणि दर्जेदार शिक्षण यामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योगधंदे उभारणीसाठी आदर्श स्थान बनले आहे. राज्याने पायाभूत सुविधा आणि स्मार्ट शहरे यावर लक्ष केंद्रित केले आहे.
परिचय:
“मेक इन महाराष्ट्र” कार्यक्रमाचा भाग म्हणून, राज्यामध्ये गुंतवणूक पोषक वातावरण वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुरोगामी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी, गुंतवणूकदाराला त्याचा व्यवसाय आणि स्थान यावर अवलंबून शासनाच्या निरनिराळया विभागांकडून विविध मान्यता / निपटारा /परवानग्या घेणे आवश्यक आहे.
ही़ प्रक्रिया सुसंगत व कार्यक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने www.maitri.gov.in. येथे मान्यता / निपटारा /परवानग्या यांची तपासणी यादीसहीत एक व्यापक सूची आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न अपलोड केले आहेत. याव्दारे गुंतवणूकदारास संबंधित मान्यता प्राधिकारी तसेच अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची सूची ओळखण्यास मदत होईल.
ऑनलाइन प्रणाली पाहण्यासाठी खाली उल्लेख केलेल्या टप्प्यांनी गुंतवणूकदारास विशिष्ट तपशील आणि त्याच्या / तिच्या उद्योग घटकाला लागू असलेल्या सर्व शासकीय परवानग्या / मान्यतांशी संबंधित माहिती प्राप्त करणे शक्य आहे:
- “उपलब्ध मान्यता यादी पहा” या लिंकवर क्लिक करा
- स्थळनिहाय मान्यता यादी पहाण्यासाठी “स्थान” फिल्टर वापरून एमआयडीसी किंवा नॉन एमआयडीसी निवडा
- विभागनिहाय मान्यता पाहण्यासाठी “विभाग” फिल्टर वापरून एक विभाग निवडा
- क्षेत्रनिहाय मान्यता पाहण्यासाठी “क्षेत्र” फिल्टर वापरून एक क्षेत्र निवडा