_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/03/","Post":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-2/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee महिलांना घडवणारे खंबीर व्यक्तीमत्व- ज्योती पठानिया - MH General Resource महिलांना घडवणारे खंबीर व्यक्तीमत्व- ज्योती पठानिया - MH General Resource

महिलांना घडवणारे खंबीर व्यक्तीमत्व- ज्योती पठानिया

Spread the love

८ मार्च हा जागतिक महिला दिवस फक्त त्या दिवसा पुरता साजरा करु नका आपण वर्षाचे ३६५ दिवस आनंदी कसे राहू यासाठी प्रयत्न करा’’तुम्ही एखाद्या समाजापासून दुरावलेल्या महिलेला काय द्याल. नोकरी, घर, पैसा, समाजात प्रतिष्ठेने जगण्याची संधी. पण एखाद्या महिलेने समाजातील शोषित पीडित महिलांसाठी आपले जीवनच अर्पण केले असेल तर…!

Telegram Group Join Now

पुण्यातील उपनगर पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या ज्योती पठानिया ह्या मुळच्या मुंबईच्या. लग्न झाल्यानंतर त्या पुण्यातच स्थायिक झाल्या. त्यांचे शिक्षण बी.एससी (अॅग्री) पण मुळातच त्यांना समाजसेवा करण्याची आवड. विशेषत: शहरातील शोषित महिला, त्यांची लहान मुले, शोषित मुलींना सक्षम व स्वावलंबी बनविण्यापासून त्यांची ओळख निर्माण झाली.

संयुक्तरित्या एकत्रित येऊन या कामाला अजून गती देण्यासाठी १९९४ साली त्यांनी नोंदणीकृत चैतन्य महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या क्षेत्रातील महिलांसाठी काम करण्यासाठी वाघिणीचे काळीज लागते व अनेकांशी शत्रूत्वही घ्यावे लागते. परंतु त्यांना न घाबरता अनेक अडचणीतून मार्ग काढत सर्व प्रथम कुटुंबसखी समुपदेशन केंद्र व त्यानंतर अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी ‘आश्रय’ सुरु केले.’आश्रय’ चालवताना त्यांना लक्षात आले की सर्वात जास्त पीडित महिला या बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला असतात. यामुळे त्यांनी देहव्यापारात अडकलेल्या, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या मुलांसाठी मंडळाच्या माध्यमातून बालसंस्कार केंद्र, पोटभर जेवण देणारे सार्वजनिक संगोपन केंद्र, खेळण्याचे, अभ्यासाचे व झोपण्याचे सुरक्षित ठिकाण म्हणून चैतन्य मंडळ संचालित उत्कर्ष रात्रीचे पाळणाघर पुण्यातील बुधवार पेठेत सुरु केले.

अडचणीत सापडलेल्या महिला व मुलींना बाहेर काढून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट या स्व.प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांना नर्सिंग, हाऊस किपींग, चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा मानस प्रगतीपथावर आहे. एका महिलेस मदत केल्यावर ती १०० अन्य महिलांना मदत करते हे त्यांचे उद्दिष्ट सिद्ध होताना दिसत आहे. काळाची पावले ओळखत या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी महिलांना आधुनिकतेने सक्षम केले आहे.

सध्या फसवून देहव्यापारात अडकलेल्या, लैंगिक शोषण होत असलेल्या महिला आणि महिलांची तस्करी, लैंगिक छळ, कौटुंबिक ताण, मानसिक अस्थिरता, समाजाने वाळीत टाकलेल्या स्त्रिया व मानसिक छळाने पीडित महिलांची या मंडळात वैद्यकीय काळजी घेतली जाते. तसेच येथे महिलांना मानसिक उपचार, शिक्षण, सामाजिक सुविधा दिल्या जातात.

चैतन्य महिला मंडळात सर्व वयोगटातील मुली व महिला आहेत. येथे पीडित महिलेसोबत तिच्या सात वर्ष वयापर्यंतच्या मुलांना राहण्याची मुभा आहे. आजवर मंडळातून सर्व जाती धर्मातील महिला व मुलींना सक्षम बनवण्यात आले आहे. या सर्व महिला समाजातील विविध क्षेत्रात चांगल्या पध्दतीचे काम करत आहेत व आज जी वेळ त्यांच्यावर आली ती इतर महिलांवर येऊ नये म्हणून अनेक गरजू महिला व मुलींना मदत करत आहेत. तसेच मंडळाच्या माध्यमातून कौंटुबिक सल्ला केंद्र व एक मोफत कायदेशीर मदत केंद्रही सुरु करण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया सनदशीर मार्गाने पूर्ण व्हावी यासाठी ज्योती पठानिया यांनी स्वत: एलएलबी चे शिक्षण देखील घेतले आहे.

त्यांच्या या निस्वार्थ, प्रेरणादायी कामासाठी त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सोसायटीच्यावतीने महिला चेतना पुरस्कार, क्रांतीदूत पुरस्कार, संपदा समाज भुषण पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार, सावरकर पुरस्कार व सखीगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या त्या महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी पूर्ण वेळ चैतन्य मंडळात काम पाहतात.

Related Posts

जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना

Spread the love

Spread the love सुधारीत बीज भांडवल योजना जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम समुह विकास प्रकल्प केंद्र शासनाचे प्रस्तावित नक्षलग्रस्त…

दास्य अथवा गुलामगिरी, वेठबिगारी आणि भूदासपद्धती ह्या तिन्ही सामाजिक प्रथा

Spread the love

Spread the love (स्लेव्हरी). दास्य अथवा गुलामगिरी, वेठबिगारी आणि भूदासपद्धती ह्या तिन्ही सामाजिक प्रथा अशा आहेत, की ज्यांत मालक आणि गुलाम, वेठबिगारी वा कूळ यांचे परस्परसंबंध कोणत्याही…

बचतगटाने साकारला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग

Spread the love

Spread the love बचतगटाच्या महिला उद्योग स्थापनेत मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून पारंपारीक गृह उद्योगांपलीकडे महिला झेप घेत आहे. पारंपारीक घरगुती खाद्यपदार्थ्यांच्या पुढे जावून पुरुषांच्या बरोबरीने महिला…

‘तिच्या’ जिद्दीला सलाम…

Spread the love

Spread the love स्वच्छतेसाठी कुठल्याही मोठ्या आर्थिक मदतीची गरज नाही. गरज आहे ती केवळ मानसिकता बदलण्याची. याची प्रचिती येते ती पालघर जिल्ह्यातील नांदगाव शेजारी असलेल्या राजेवाडी या…

प्रदर्शनातून व्यवसायवृद्धी | Exibition And Business Presentation

Spread the love

Spread the love मुंबईतील बांद्रा (प.) रेक्लमेशन म्हाडा मैदान येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महालक्ष्मी सरस प्रदर्शनात देशभरातील 476 स्टॉल्स लावण्यात आले. यामध्ये हस्तकलांच्या…

“शासनाच्या विविध योजना”| “Various schemes of Govt”

Spread the love

Spread the love शासनाच्या विविध योजना प्रस्तावना बायोमेट्रिक आधार क्रमांक संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *