माणसाकडे विक्री कौशल्य असेल तर तो यशस्वी होतो असे प्रेरणादायी लेखन करणाऱ्या लेखकांनी लिहून ठेवले आहे. आजकाल सेवा आणि विक्री कौशल्य असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या अनेकांना मोठ्या नामांकित कंपन्यात संधी मिळाल्या आहेत. मार्केटिंग तंत्र नव्याने विकसित होत असताना या विषयात प्रशिक्षण घेतलेल्यांना उत्तम संधी उपलब्ध आहेत. सातत्याने वाढत जाणाऱ्या आणि भविष्यात उत्तम प्रगतीची हमी असणाऱ्या या क्षेत्राविषयी जाणून घेवूया खास करिअरनामा या सदरासाठी.
पात्रता
डिप्लोमा कोर्ससाठी बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच पदव्युत्तर पदवीसाठी पदवीधर असायला हवे. या विषयात एमबीए ही करता येईल. कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यश मिळविणे सहज सोपे जाते.
आवश्यक गुण
या क्षेत्रात अमाप यश मिळविण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य, आकर्षक प्रभावी व्यक्तिमत्व, किमान दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व, नेतृत्वगुण, प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याची कला, संगणकाचे ज्ञान आदी गुण असल्यास यश मिळविणे सहज शक्य होते.
कोर्सेस
• एमबीए (मार्केटिंग)
• पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेल्स अँड डीस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट
• पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट
• पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेल्स मार्केटिंग
• पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग
• सर्टिफिकेट कोर्स इन सेल्स अॅडवान्टेज
कामाच्या संधी
हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर इन्शुरन्स, लॉजीस्टिक, रिटेल आदी क्षेत्रात नोकरी मिळेल. हे क्षेत्र गतिमान असून इतर क्षेत्रांपेक्षा वेगाने विस्तारत आहे त्यामुळे यास हाय ग्रोथ सेक्टर असेही म्हटले जाते. उत्तम कौशल्य असणाऱ्या उमेदवारांची मागणी नेहमीच असते.
वेतन
सुरुवातीस २० ते २५ हजारापर्यंत वेतन मिळू शकते. तसेच तीन ते चार वर्षाचा अनुभव मिळाल्यास चांगले आकर्षक वेतन मिळते. काही संस्था प्लेसमेंट पद्धतीने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात.
प्रशिक्षण संस्था
• इंडियन इन्स्टीट्युट ऑफ फॉरेन ट्रेड दिल्ली
• आयआयएम, इंदौर
• सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
• अमीटी बिझनेस स्कुल, मुंबई
• दत्ता मेघे इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर
• डीआयईएमएस, औरंगाबाद
• चिंतामणराव इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सांगली
• धन्वंतरी इन्स्टीट्युट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, नाशिक
• डी.वाय. पाटील स्कुल ऑफ मॅनेजमेंट पुणे
• आयएम, जालना
• एमआयटी, पुणे
• एमआयटी स्कुल ऑफ डीस्टन्स एज्यु. कोल्हापूर