_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee हुकूमशाही (Dictatorship) - MH General Resource हुकूमशाही (Dictatorship) - MH General Resource

हुकूमशाही (Dictatorship)

हुकूमशाही : हुकूमशाही हा राजकीय शासनाचा एक प्रकार आहे. एक व्यक्ती, व्यक्ती समूह, एक राजकीय पक्ष किंवा लष्करी सेनानीचा समूह निरंकुश राजकीय सत्ता धारण करतो. त्यास हुकूमशाही म्हटले जाते. हुकुमशाही हा डिक्टेटरशिप या इंग्रजी शब्दाचा पर्यायी शब्द असून तो मूळ डिटेक्टर (हुकूमशहा) या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या शब्दाचा अर्थ व व्याप्ती कालसापेक्ष असून वेळोवेळी ती बदलल्याचे आढळून येते. हुकूमशाही या संकल्पनेची सुरुवात प्रारंभी रोमन संस्कृतीत झाल्याचे आढळते. त्यावेळी रोमन सिनेट राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रारंभी हुकूमशहा नेमीत असे. अशावेळी सर्व सत्ता एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित केली जाई. ही सत्ता तात्पुरती असून अधिक काळ एका व्यक्तीच्या हातात ती राहू द्यावयाची नाही असा तत्कालीन विधी संहितेचा दंडक होता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जुलिअस सीझर (इ. स. पू.४९ – ४४) याच्या अनिर्बंध सत्तेला मार्क अँटनी याने आळा घातला. मात्र आधुनिक काळात हुकूमशहा त्यांच्या मृत्यूपर्यंत किंवा लोकांनी त्यास पदभ्रष्ट करीपर्यंत निरंकुश सत्ता धारण करतो. आत्तापर्यंतच्या हुकुमशाहीच्या इतिहासात नेपोलियन बोनापार्ट (१८०४ – १४) किंवा केमाल आता तुर्क (१९२३ – ३८) यासारखे काही अपवादात्मक लोकहितैशी हुकूमशहा होऊन गेले. त्यांनी अनुक्रमे फ्रान्स व तुर्कस्तान या देशांची सर्वांगीण उन्नती करून भावी पिढीसाठी अनेक विधायक गोष्टी मागे ठेऊन दिल्या आहेत. लोकशाही प्रणालीत राज्यसंस्था ही व्यक्तीच्या संवर्धन सुखासाठी प्रयत्नशील असते, तर हुकूमशाही प्रणालीत राष्ट्राच्या हितासाठी हुकुमशहा आहे, असा त्या व्यक्तीचा दावा असतो. या मध्ये या दोन तत्त्वांचा संघर्ष अनुस्यूत आहे.

Telegram Group Join Now

हुकूमशाही व राजेशाही या समरूप शासनपद्धती आहेत. दोन्हीत एकाच व्यक्तीची अनिर्बंध सत्ता हे साम्य आहे. प्राचीन काळापासून या दोन्ही पद्धती अस्तित्वात आहेत. राजाला लोकांची अनुमती असते, आणि तो रूढी-परंपरा, चालीरीती तसेच देशातील संस्थांचा आदर करतो. अपवादात्मक काही राजे सोडल्यास राजे हे प्रजेच्या कल्याणासाठी तत्पर असल्याचे दिसते. याच्या उलट हुकूमशहा हा सर्वेसर्वा असतो. त्याला समाजाचे पाठबळ नसते. शिवाय राजेशाही वंशपरंपरागत असते. राजे प्रसंगोपात मंत्रीगण, सरदार, धर्मगुरू आदींशी सल्लामसलत करतात. मात्र हुकूमशहा सर्वस्वी स्वेच्छा वर्तन करतो आणि एक हाती कारभार करतो. हुकूमशहानी शस्त्रास्त्रांच्या धाकाने, दहशत पसरवून बळजबरीने सत्ता काबीज केलेली असते. ती टिकावी म्हणून खोटी प्रचार यंत्रणा राबविली जाते. राजेशाहीच्या तुलनेत हुकूमशाहीचे स्वरूप हे पूर्णतः दहशदवादी, एकतंत्री व दडपशाहीचे असते. दंड शक्तीवर ते अवलंबून असते. एकोणिसाव्या – विसाव्या शतकात वंशपरंपरागत राजेशाहीचा अंत होऊन प्रजासत्ताक लोकशाही व हुकूमशाही या दोन शासनप्रणाली प्रसृत झाल्या. हुकूमशाहीने वेगवेगळे स्वरूप धारण केले. लॅटिन अमेरिकेत एकोणिसाव्या शतकात स्पेनच्या वसाहतवादातून मुक्त झालेल्या नवोदित राष्ट्रात स्वघोषित नेते हुकूमशहा बनले. मेक्सिकोत अंतोनिओ लोपेझ द सांता आना आणि अजबटिनात व्हान मॅनवेल द रोमास हे हुकूमशहा उदयाला आले. त्यांना लष्कराचा पाठिंबा होता, तर आशिया व आफ्रिका खंडातील युरोपीय वसाहतवादाच्या जोखडातून दुसऱ्या महायुद्धानंतर मुक्त (स्वतंत्र) झालेल्या राष्ट्रात भारत – श्रीलंका पाकिस्तान वगैरे काही देश वगळता तत्कालीन नियुक्त राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान यांनी स्वपक्षीय हुकूमशाही  प्रस्थापित करून विरोधकांना तुरुंगात टाकले. काही राष्ट्रात लष्करी क्रांती होऊन लष्कर प्रमुख सत्ताधारी झाले. बहुतेक हुकूमशहांनी निवडणुकावर बंदी घातली, तर काहींनी निवडणूकीचा फार्स करून आपले स्थान बळकट केले. मात्र सर्वांनी मूलभूत स्वातंत्र्यावर निर्बंध लादले. विरोधी पक्षावर बंदी घातली. प्रसारमाध्यमांवर बंदी घातली. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या युरोपीय देशात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात साम्यवादी क्रांतीमुळे पूर्व युरोपातील १९३९ – ४५ दरम्यान कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हुकूमशाही राजवटी प्रस्थापित झाल्या. ही सर्व राष्ट्रे सोव्हिएट रशियाची अंकित राज्ये होती. सोव्हिएट रशियात जोसेफ स्टालिन (१९२४ – ५३) हा सर्वेसर्वा होता. याच सुमारास स्पेनमधील सैनिकी उठावाला फ्रॅन्सिस्को फ्रांको( १९३९ – ७५) याने सक्रिय पाठिंबा देऊन सत्ता काबीज केली. (१९३७) तसेच चिलीमध्ये ऑगस्टो पिनोचेत  (१९७४ – ९०) हा हुकूमशहा होता. या हुकूमशहा नी आपली मतप्रणाली सत्ता व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तसेच विरोधकांना नामोहरम करण्यासाठी बळाचा व दहशतीचा वापर केला. लष्कर नियंत्रणाखाली ठेवले आणि प्रसार माध्यमे आपल्या वर्चस्वाखाली ठेवून त्यांना आपले प्रवक्ते बनविले. लोकशाहीनिष्ठ लोक कार्यकारी प्रमुखाला अनियंत्रित अधिकार देण्याच्या विरुद्ध असतात. तथापि युद्ध आक्रमण देशांतर्गत बंडाळी किंवा आर्थिक मंदी यासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीत संविधानवादी शासने कार्यकारी प्रमुखाला (राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान) सर्व प्रशासकीय निर्गमन अधिकार प्रदान करतात आणि देशात आणीबाणीची घोषणा करतात. या संधीचा फायदा घेऊन काही महत्त्वाकांक्षी कार्यकारी प्रमुखाकडून हुकूमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. याची दुसऱ्या महायुद्धापूर्वीची उत्तम उदाहरणे म्हणजे जर्मनीमध्ये वायमार संविधानाचा फायदा घेऊनच ॲडॉल्फ हिटलरने (१९३३ – ३९) हुकूमशाही निर्माण केली. तसेच बेनितो मुसोलिनीला (१९२२ – ४३) राजाने व संसदेने पंतप्रधान करून सर्व अधिकार दिले. त्याने फॅसिस्ट पक्षाचे वर्चस्व वाढून वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादून विरोधकांच्या सभावर बंदी घातली आणि  संसदेकडून एका अधिकृत कायद्याने राज्य करण्याचा संपूर्ण अधिकार मिळविला (१९२६) व तो हुकूमशहा झाला. अशाच प्रकारे पोलंडमध्ये पिलसुदस्की आणि पोर्तुगालमध्ये साला झार यांनी हुकुमशाही राजवट आणली. हुकूमशाहीचे अस्तित्व दहशत व दंड शक्तीवर अवलंबून असल्याने तिला सतत विरोध होणे स्वाभाविक आहे. ती लोकशाहीचा पर्याय होऊ शकत नाही. हे इतिहासाने स्पष्टपणे दाखवून दिले आहे. नेपोलियनने सुद्धा दंड शक्तीच्या योगाने सर्व प्रश्न कायमचे सुटू शकत नाहीत, अशी कबुली दिली आहे. कारण हुकुमशाहीच्या उदयातच तिच्या विनाशाची बीजे पेरलेली असतात.

संदर्भ :

  •  Cobbon, Alfred, Dictatorship – Its History and Theory, New York,1970.
  •  Marriott,John, A Dictatorship and Democracy,Arden,19

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *