_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee बचत आणि गुंतवणुक (Investments Basis): - MH General Resource

बचत आणि गुंतवणुक (Investments Basis):

आपल्या नियमित कमाई मधुन खर्च काढून जी बचत होते त्याला इंग्रजीमध्ये सेवींग (Savings) म्हणतात. आणि ती बचत भविष्यातील खर्चासाठी उपयोगी येते. उदाहरण: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लग्नप्रसंगी तसेच औषध उपरचारासाठी वगैरे. बचत केलेला पैशांची योग्य गुंतवणूक करून जास्त कमाई मिळवण्यासाठी गुंतवणूकीचे आयोजन करणे महत्वाचे आहे. या आयोजनालाच गुंतवणूक (Investments) असे म्हणतात.

Telegram Group Join Now

फुगावा (महागाई): Inflation

फुगावा म्हणजे वस्तुच्या किंमतीत घट येणे होय. दुस-या शब्दात सांगायचे तर एक वस्तु आज आपल्याला दहा रूपायात मिळत असेल तर तीच वस्तु एका वर्षा नंतर दहा रूपाया ऐवजी अकरा ते बारा रूपायात मिळू शकते याच वाढलेल्या किंमतीला फुगावा असे म्हणतात. दुस-या उदाहरणावरून आपणास कळते की समजा फुगाव्याचा वार्षिक दर ७% आहे आणि आपण ६% मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपली बचत १% होते अशा प्रकारे बचतीच्या दरात घट होते. म्हणुन गुंतवणूचे आयोजन करणे महत्वाचे आहे. हे फुगावाच्या दरावर अवलंबुन आहे. पण त्याच बरोबर त्यातील धोक्याच प्रमाण देखिल कमी असावे लागते.

गुंतवणुकीचे सुवर्ण नियम (Golden Rules of Investment):

जस उत्पन्न होणार, तशीच बचत सुध्दा करणे जरूरी आहे. त्याच बरोबर योग्य प्रकारे करणे अत्यतं आवश्यक आहे.

१. बचत नियमित करणे जरूरी आहे.

२. बचत दिर्घ काळासाठी करणे जरूरी आहे.

३. एकाच ठीकाणी गुंतवणूक न करता ती अनेक प्रकारे करावी.

गुंतवणुकीचे आयोजन करताना महत्वाचे मुददे (Investment Considerations):

आपण बचत केलेल्या पैशांची, योग्य गुंतवणूक करून जास्त कमाई करू इच्छितो परंतु ती गुंतवणूक जर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केली नाही त्या गुंतवणूकीचा काही उपयोग होत नाही..

१. बचत आयोजनचे मुख्य ध्येय आहे.

२. गुंतवणुक केल्या नंतर त्यावर आपले नेहमी लक्ष असले पाहीजे.

३. बचत योजनेची संपूर्ण माहिती असली पाहिजे.

४. तुम्ही केलेल्या बचत मधुनच गुंतवणूक करा. कर्ज काढुन करू नका.

५. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणुक करा..

६. नुकसान सहन करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी.

व्यक्तिने सर्व प्रथम स्वतःच्या गुंतवणुकीच्या उददेशावर व्यवस्थित लक्ष ठेवले पाहीजे. आपली बचत राशी वाढायला हवी मात्र त्यातील धोका कमी असायला हवा. आयोजनाच्या पूर्वी तुम्हाला खालील मुददयांवर अभ्यास करणे महत्वाचे आहे. तुमच्या कठिण प्रसंगात बचत आयोजनावरती कोणत्याही प्रकारच्या दबाव न येणे हे प्रथम महत्वाचे आहे.

बचत करण्यापुर्वी तुम्ही खाली दिलेल्या मुद्दयाचा अभ्यास करणे जरूरी आहे..

१. भविष्यात अचानक येणा-या कठीण प्रसंगासाठी अगोदरच वेगळी बचत करावी.

२. त्यासाठी जीवनविमा मेडिकल विमा आणि अपघात विमा करून घ्यावा.

३. खर्चावरती नियंत्रण पाहिजे.

४. निवृत्तीच्या वेळी आमदनीची योजना पाहिजे.

गुंतवणुकीच्या आयोजनातील मुख्य धोरणे (Investment Selection Criteria):

गुंतवणुक करताना खालील गोष्टींचे आयोजन करणे खूप महत्वाचे आहे.

१. धोका (Risks)

२. फायदा (Return)

३. रोख रक्कम (Liquidity) मिळण्याची आणि बाजारात लगेच विकण्य क्षमता.

४. खर्च (Cost) ५. वेगवेगळया सेक्युरिटीमध्यें (Diversification) गुंतवणूक करणे.

६. सेक्युरिटीस वरील कर (Taxes) सेक्युरिटीस वरील कर (Efforts of expertise)

गुंतवणुक करण्याआधी घ्यायची काळजी (Care to be taken whi investing):

गुंतवणूक करण्याच्या पूर्वी खालील मुददयांची तपासणी करणे जरूरी आहे.

१. गुंतवणुकीची माहिती देणारे महत्वाचे कागदपत्र पाहणे.

२. दस्तावेजातील कायदेकलमांची माहीती करून घेणे.

३. गुंतवणुक करताना येणारा खर्च व त्यात नफा कीती होईल हे पाहणे..

४. गुंतवणूकीची योजना तुमच्या गरजे प्रमाणे आहे कि नाही हे तपासणे. ५. दलालाकडून पूर्ण माहिती मिळवणे.

६. तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक कराल ती सुरक्षित असली पाहीजे. ७. कोणत्या आयोजनामधे काही अडचण आली तर बाहेर निघण्याचा रस पाहिल्यापासून माहित असायला हवा नाहीतर त्यात गुंतवणुक करू नये.

गुंतवणुकीच्या योजनेचे वेगवेगळे प्रकार (Type of Investment):

१. भौतिक गुंतवणूक (Physical Assets Investment): ही गुंतवणुक पुढील प्रकारे केली जाते. उदा सोने, जमिन खरेदी करणे.

२. आर्थिक गुंतवणुक (Financial Assets investments): ही गुंतवणूक पुढील प्रकारे केली जाते उदा. बेंकेची बचत योजना पोस्टा बचत योजना, पी.पी.एफ पेन्शन योजना शेअर बाजार करणे वगैरे. यात गुंतवणू

खालील दिलेले आयोजन प्लान

• पब्लीक प्रोव्हिडन्ट फंड

• नॅशनल सेविंग सर्टिफिकेट

• बैंक फिक्स डिपोझिट (बँकेत ठराविक मुदतीच्या ठेवी)

• बँक रिकरिंग डिपोजित

• इन्फ्रास्ट्रकचर बॉन्ड

कंपनी फीक्स डीपोझीट (NBFC’s) • आरबीआय रिलीफ बॉन्ड

• पोस्टऑफिस टाइम डीपोजिट

पोस्ट ऑफिस मंथली स्किम (MIS)

• पोस्ट ऑफीस रिकरींग डीपोजिट

• नॅशनल सेविंग स्किम (NSS)

किसान विकास पत्र

मिच्युल फंड युनिट्स

• शेअर

• डिबेन्चर

रियल इस्टेट

• कमोडी

पब्लिक प्रोविडंट फंड (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी): Public Provident Fund

पब्लीक प्रोविडंट फंड (PPF) टॅक्सची बचत करण्यासाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे. पी.पी.एफ (PPF) चे खाते स्टॅट बैंक (SBI), अथवा त्यांची सबसीडी, नेशनलाइज बेंक आणि काही नियुक्त पोस्ट ऑफीस मध्येच खोलु शकतो. पी.पी.एफ (PPF) हे खाते फक्त ५०० रूपये भरून आपल्या नावावरती अथवा नाबालिक (minor) मुलांच्या नावावरही खोलु शकतो. त्याच वार्षिक चक्रवाढ व्याज ८ टक्के आहे. ते आपणास सरकारने ठरवल्याप्रमाणे वेळो वेळी मिळते.

लाभ (फायदे): Advantages

१. तीन वर्षानंतर लोन घेऊ शकतो. २. तुमचे सर्व पैसे पूर्ण सुरक्षित राहतात.

३. पालक त्यांच्या नाबालिक हार्मन्रह मुलांच्या नावावर पीपीएफ खोलु शकता. आणि करात सवलत मिळवू शकतात.

४. पीपीएफ ची रक्कम पूर्णपणे कर मुक्त असते.

५. पीपीएफ मध्ये ठेवलेल्या रकमेवर कोर्ट जपती आणु शकत नाही. तसेच कर्जदेणाराही यावर जप्ती आणु शकत नाही.

तोटा (Disadvantages):

१. योजनेची मुदत १५ वर्षे असते. ही योजना वयस्कर लोकांसाठी योग्य

नाही. २. चार वर्षा पर्यंत जमा केलेल्या रक्कमेचे फक्त ५०८ आपण ७ वर्षाने काढु शकतो.

नेशनल सेव्हिंग सर्टिफकेट (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे): National Savings Certificates

नेशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) ण्श्छह सुरक्षित आणि करात सवलती मिळवून देणारी योजना आहे. त्याचे चक्रवाढ व्याज ८% आहे. व्याजाची गणती सहा महीन्याने होते. या योजनेला सरकारचा पाठीबां आहे म्हणुन ती संपूर्ण सुरक्षित आहे. यांचे फिजिकल सर्टिफिकेट पोस्ट ऑफीसमधुन देण्यात येतात. याचा कालावधी ६ वर्षाचा असतो.

लाभ (फायदे): Advantages

१. या योजनेअंतर्गत आपण बँकेतून कर्ज काढु शकतो…

बॅक फिक्स डिपोझिट (Bank Fixed Deposits):

तुम्ही जेव्हा बँकेमध्ये स्थिर मुदतीसाठी आणि तसेच स्थिर व्याजाने रक्कम ठेवता याला फीक्स डीपोझिट (FD) म्हणतात.

स्थिर मुदतीत तुम्हाला व्याजासहीत मुळ रक्कम परत मिळते. आज या योजने मध्ये बैंक ८ ते १०% व्याज देते. व्याजाचा दर मुददल डीपोजित करताना ठरवला जातो डीपोजितची रक्कम आणि कालावधी जास्त असेल तर त्याचा व्याजदर साधारणतः जास्त असतो. हे या सर्व योजनेत सोइस्कर आहे. जेवढी कमी जास्त रक्कम तुम्हाला ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेऊ शकता. प्रत्येक बँकेतील व्याजाचा दर वेगवेगळा असतो.

लाभ (फायदे): Advantages

१. ही सर्वात सुरक्षीत गुंतवणुक आहे. या मुळे ७५ ते ९० बँकेकडुन कर्ज मिळते. ते आपल्याला व्याज देतात त्यावर २८ जादा भार आकारतात. २. नेशनलाइज बँकेत अथवा समाजात प्रसिध्द असलेल्या बँकेतील योजना जास्त सुरक्षित असते.

तोटा (Disadvantages):

१. या गुंतवणुकीतील व्याजाचा दर दुसर-या गुंतवणुकीहून कमी आहे.

रिकरिंग बँक डिपोजिट (Recurring Bank Deposits):

या योजनेमध्ये तुम्ही स्थिर मुदतीसाठी दर महिन्याला ठरवलेली रक्कम जमा करू शकता आणि त्यावरील व्याजाची माहीती बँककडून मिळते. या योजनेत स्थिर व्याजाबरोबर मुळ रक्कम परत मिळते. ही योजना कमी वेतनदारांना खुपच लाभदायक आहे.

फायदा (Advantages):

१. या योजनेमध्ये थोडी थोडी रक्कम प्रत्येक महिना बचत करून मुदत संपल्यावर मोठी रक्कम मिळते म्हणुन ही योजना मध्यमवर्गीय लोकांसाठी लाभदायक आहे..

२. ही योजना नोकरी करणा-या तसेच लहान व्यवसाय करणा-यासाठी खूपच फायदेशीर आहे.

तोटा (Disadvantage):

१. हया योजनेमध्ये व्याजाचा दर कमी आहे.

इन्फ्रास्ट्रकचर बॉन्ड (इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड): Infrastructure Bonds

हे बॉन्ड आयसीआयसीआय बैंक (ICICI) आणि आयडिबीआय (IDBI) • बैंक जाहीर करते. त्यांचे नाव (ICICI) आयसीआयसीआय सेफ्टी बॉन्ड आणि (IDBI) आयडिबीआय फ्लेक्सी बॉन्ड असे आहे. आयसीआयसीआय चा डीप

सेफ्टी डीस्काउन्ट बॉन्ड हा उत्पन्नावरील करांमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रसिध्द आहे. हे बोन्ड फीजीकल कींवा डीमेट मार्फत मिळू शकतात.

लाभ (फायदे); Advantages

१. हे बोन्ड आपण बँकेत ठेवून कर्ज घेऊ शकतो, या कर्जाची रक्कम त्याच्या वर्तमान कीमंतीवर अवलंबुन आहे.

कंपनी फिक्स डिपोजिट (कंपनी मुदत ठेवी): Company Fixed Deposits

फायनानशीयल इनस्टीटयुशन आणि नॉन बॅकींग फायनान्स कंपनीमध्ये तुम्ही व्याजावरती ठरावीक कालवधीसाठी पैसे ठेवु शकता. ही योजना कंपनीच्या अॅक्ट ५८ मध्ये येते. या योजनेत धोक्याच प्रमाण जास्त आहे, परंतु या योजनेमध्ये व्याजाचा दर बँकेपेक्षा फार जास्त असतो. या गुंतवणूकीमध्ये कंपनी कधी अडचणीत आली तर व्याज मिळणे कठिण होते आणि केव्हा केव्हा मुळ मुददल मिळण्याची शक्यता ही कमी असते म्हणुन यात धोका पुष्कळ आहे.

फायदे (फायदे): Advantages

१. या गुंतवणुक योजनेमध्ये व्याजाच प्रमाण बैंक, पोस्ट ऑफिस, पी.पी. एफ पेक्षा जास्त असते.

तोटा (Disadvantages):

१. कंपनी डिपोजिट ही असुरक्षित गुंतवणूक आहे. या मध्ये पैशाची गुंतवणूक करण्यासाठी क्रेडीट, रेटींग जाणुन घेणे महत्वाचे आहे आणि जर व्याजाचा दर जास्त असेल तेव्हा जास्त धोका असु शकतो.

२. कंपनी काही कारणास्तव अडचणीमध्ये आली तर व्याज आणि मुळ मुददल मिळणे अवघड होते. तसेच हया गुंतवणूकीमध्ये भरोसा नसतो. माझा तुम्हाला असा सल्ला आहे की हया योजनेपासून दुर रहा.

आरबीआय रिलीफ बोन्ड ( आरबीआय रिलीफ बॉन्ड): RBI Relief Bonds

हे बोन्डस रिजर्व बैंक स्वत: काढते आणि सध्यांचे त्यावरील व्याज ८% आहे आहे अगोदर ८.५% होते. यावरील चक्रव्याढ व्याजाची दर सहा महिन्यानी गणना होते. त्यांची मुदत पांच वर्ष आहे. याचे अर्ज स्टेट बँकेच्या कींवा

नीयुक्त केलेल्या स्टेट बँकेच्या शाखामधुन आणि नेशनलाईज बँकेच्या शाखेतून मिळतात. यांचे दोन प्रकार आहे यातील एक प्रकार करमुक्त (Tax free) आहे. आणि दुस-यावर सामान्य दराने कर आकारला जातो.

यात सुरूवातीला किमान १००० रूपये गुंतवणुक करावी लागते आणि जास्त करायची असल्यास ती १०००च्या गुणांकात करावी लागते. या गुंतवणुकीचा कालावधी अमर्यादीत आहे.

लाभ (फायदे): Advantages

१. आरबीआय बॉन्ड योजनेअंतर्गत आपण बँकेकडुन कर्ज घेवू शकतो. २. ही सर्वात सुरक्षीत गुतंवणूक योजना आहे. याचे व्याज आणि मुळ रक्कम स्थिर मुदती नंतर परत मिळते. या योजनेत कोणताच धोका नाही कारण हे बॉन्डस आपल्या देशाची सेन्ट्रल बैंक काढते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपोजिट (Post Office Time Deposit):

पोस्ट ऑफिस टाइम डिपोजिट गुंतवणकी मध्ये वार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर खालील प्रमाणे आहे आणि त्याची दर ३ महिन्यानी गणती केली जाते ही गुंतवणुक आपण देशाच्या कोणत्याही पोस्ट ऑफीस मध्ये करू शकतो.

पूर्वीचे वर्ष ६.२५%

वर्ष ६.५०% चौथे वर्ष ७.५०%

तिसरा वर्ष ७.२५%

या योजनेत कोणत्याही प्रकारच्या रेटिंग नाही कारण की याला सरकारची मान्यता आहे. या डीपोजीट ची रक्कम पोस्टात भरावी लागते आणि पोस्टातूनच स्थिर मुदतीनंतर ती परत मिळते.

लाभ (फायदे): Advantages

१. ही योजनेला सरकारचे सहकार्य असल्यामुळे स्थिर मुदतीत व्याजासह रक्कम परत मिळते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डीपोजिट (Post Office Recurring Deposit):

ही गुंतवणुक बँकेच्या रिकरींग योजनेप्रमाणेच आहे. ही योजना दीर्घ काळासाठी चांगली आहे. परंतु नियमीत कमाई इच्छणा-यासाठी सोईस्कर नाही. यात आपण सतत कमी जास्त गुंतवणुक करत राहील्यानी नंतर ५ वर्षानी मोठी रक्कम प्राप्त होते. या योजनेमध्ये पोस्ट ऑफिस ७.५% व्याज देते (बोनस योजना बंद झाली आहे).

जर तुम्ही पाच वर्षासाठी रिकरींग योजनेत दर महिना १००० रूपये भरलेत तर मॅच्युरिटीत तुम्हाला ७२,८९० मिळतील.

लाभ (फायदे): Advantages

१. पोस्ट ऑफीस स्किमला सरकारी मान्यता आहे. पोस्टात व्याज आणि मुळ रक्कम सुरक्षित असते.रक्कम स्थिर मुदतीने मिळते.

पोस्ट ऑफीस मासिक इनकम स्किम (Post Office Monthly Income Scheme):

हया योजनेमध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारास व्याज मिळते. ही योजना दर महिन्याला स्थिर उत्पन्न मिळण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेत एकाच वेळी पैसे जमा केल्यानंतर त्यावर दर महीन्याला व्याज मिळते. या योजनेचा लाभ जास्त करून निवृत्त व्यक्ती अथवा विधवा स्त्रियांनी स्वतः चा खर्च चालवण्यासाठी करून घेतला पाहीजे.

या योजनेमध्ये पोस्ट (MIS) ८% टक्के व्याज देते, या योजनेमध्ये बोनस मिळत नाही. (राज्यांनी अगदी सुरूवातीला यात गुंतवणुक केलेली आहे त्यांना मात्र याचा बोनस प्राप्त होतो.)

नॅशनल सेविंग स्किम (राष्ट्रीय बचत योजना): National Saving Scheme

ही योजना पोस्ट ऑफिस मार्फत चालते. या योजनेमध्ये ७% टक्के चक्रवाढ व्याज मिळते. या योजनेमध्ये आयकर विभागाच्या टॅक्समध्ये सूट

मिळते. ही पुर्णपणे सुरक्षीत गुंतवणूक आहे. एकदा व्याजाचा दर ठरवला की तो कमी जास्त होत नाही. ही योजना देशाच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

ही योजना चार वर्षासाठी असते. पश्‍ ची मुदत ४ वर्षाहुन अधिक केली जाऊ शकते आणि त्याचे फीजीकल पध्दती सर्टीफीकेट पोस्ट ओफीसमधुन प्राप्त होते.

तोटा (Disadvantages):

१. या योजनेतील अंतर्गत बँकेतून कर्ज मिळत नाही.

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra):

या योजनेत गुंतवणुक आठ वर्ष आणि सात महिन्यामध्ये दुप्पट होते. या योजनेत पैसे मुदतीच्या पूर्वी मिळू शकतात. आणि याची विक्री देशातील सर्व पोस्ट ऑफीस मधुन होते. चक्रवाढ व्याजाचा दर वार्षिक ८% आहे.

या योजनेत नियमीत उत्पन्न मिळत नाही या योजनेला सरकारचा पाठीबां आहे म्हणून ही सुरक्षित योजना आहे.

म्युच्युअल फंड (Mutual Fund):

म्युच्युअल फंड ही एक ट्रस्ट आहे ही ट्रस्ट चॅरिटी कमिशन ऑफ ट्रस्ट कडे रजिस्टर केली जाते. ही संस्था लोकांकडून पैसा जमा करून वेगवेगळया सिक्युरिटीमध्ये त्याची गुंतवणुक करते, स्कीमच्या उददेशाप्रमाणे गुंतवणुक केली जाते. दुस-या शब्दात सांगायचे तर मुच्युअल म्हणजे सामान्य लोकांचे भांडवल एकत्र करण्याच पध्दत होय.

शेअर (Shares):

कंपनीच्या भांडवलचे लहान लहान हिस्से करून ते गुंतवणुकदारांना ब्रिकीसाठी उपलब्ध करून दिले जातात यातील प्रत्येकी एका हिश्याला शेअर असे म्हणतात.

हे शेअर ज्याच्या नावावरती असतात त्यांना शेअर होल्डर असे म्हणतात, ते कंपनीचे भागीदार आहेत असे आपण म्हणतो. त्यांना मत देण्याचा अधिकार असतो. दुस-या भाषेत सांगायचे तर आपल्याकडे जितके टक्के शेअर आहेत तेवढया टक्क्याची भागीदारी त्या कंपनी मध्ये असते. (Shares Represent the Form of Fractional Ownership in a Company)

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *