General Do’s and Don’ts for Investors: (गुंतवणूकदारांसाठी काय आणि काय करू नये)
काय करावे (Do’s):
१. नेहमी सेबी SEBI कडे रजिस्टर असणा-या शेअरदलाला बरोबरच व्यवहार करावा.
२. आपल्या सर्व गुंतवलेल्या पैशांच्या दस्तावेजाची नमुनाप्रत (copy of investment document) आपणाकडे ही ठेवावे उदा. अर्ज पत्र, करारनामा ३. तुम्ही कंपनीला पाठवलेल्या दस्तावेजाचे नमुनाप्रत (Copy) स्वता: जवळ ठेवा.
४. अती महत्वाचे कागदपत्र खात्री लायक उदा. पोस्ट कींवा रजीस्टर अशा माध्यमाद्वारेच पाठवावे.
५. तुमच्या आणि कंपनीच्या मध्ये झालेल्या कराराचे. तसेच तुमच्या अंकाउन्ट
चे स्टेटमेन्ट सभांळुन ठेवावे.
६. शेअर खरीदी करत असताना तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही याची
खात्री करावी.
७. विक्री करत असताना तुमच्या कडे त्यासाठी काही जामीन आहे की नाही याची खात्री करावी.
८. जर कंपनीकडून तुम्हाला दिलेल्या कालावधीत झालेल्या व्यवहाराचे योग्य दस्तावेज मिळाले नाही. तर ताबडतोब ब्रोकर कींवा कंपनीला संपर्क करावा.
९. शेअरच्या व्यवहारासंबधीच्या सुचना तुमच्या ब्रोकरला स्पष्ट आणि व्यवस्थित माध्यमाने कळवा.
१०. तुम्हांला डिमेट मध्ये व्यवहार करायचा आहे की फीजीकल मार्गाने करायचा आहे हे अगोदर ठरवा.
काय करू नये (Don’ts):
१.सेबी बरोबर नोंद नसलेल्या ब्रोकर अथवा सब ब्रोकरशी व्यवहार करू नये.
२. ओळखीच्या लोकांशी व्यवहार करत असाल तरी व्यवहार पूर्ण झाल्यावर तुमचे कागद पत्र घ्यायला विसरू नका.
३. शेअर अवास्तव किंमतीने वाढेल अशी खोटी धारणा ठेवू नये.
४. काही कंपन्या शेअर मध्ये व्यवहार करण्यासाठी सरकारची मान्यता मिळाली आहे अस दाखवतात परंतु काही वेळा त्यांना दुस-याच कुठल्यातरी कारणासाठी सरकारी मान्यता मिळालेली असते. शेअर व्यवहारासाठी नाही.
५. अफवावर विश्वास ठेवू नका.
६. आपले भांडवल पोस्ट डेट चेक ने परत मिळेलच याची खात्री ठेवू नका.
७. शेअर बाजार संबंधीत व्यक्ति व संस्थाकडून मार्गदर्शन घेण्यात काही लाज बाळगू नका.