महिला-परुष परस्पर सहमतीने एकत्र रहाणं, त्यांच्यात प्रेम असणं, शारीरिक संबंध असणं किंवा भविष्यात लग्न करण्याचा विचार करून एकत्र रहाणं याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात.
याबाबत कायदेतज्ज्ञ आणि वकिल अनिता बाफना सांगतात, “कायद्यात लिव्ह-इन रिलेशनशिपची काही व्याख्या सांगण्यात आलेली नाही. लिव्ह-इन म्हणजे दोन व्यक्ती आपल्या मर्जीने एकत्र रहाणं. कायद्याच्या कोणत्याही पुस्तकात याला मान्यता देण्यात आलेली नाही.”
त्या पुढे सांगतात, “कोर्ट म्हणतं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये मुलं जन्माला आली तर त्या मुलांना बेकायदेशीर म्हणता येणार नाही. कारण यात मुलांचा काहीच दोष नसतो. सुप्रीम कोर्टाने एका आदेशात विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलांना आई-वडीलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो असं सांगितलं आहे.”