_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/03/","Post":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-2/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम- 2020-21 - MH General Resource राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम- 2020-21 - MH General Resource

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम- 2020-21

Spread the love

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत सघन कापूस विकास कार्यक्रम- 2020-21

         कापूस उत्पादनास चालना मिळावी या उद्देशाने सदर कार्यक्रम राज्यातील धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपुर, चंद्रपुर या प्रमुख 16 कापूस उत्पादक जिल्हयात राबविण्यात येत आहे.

Telegram Group Join Now

राबविण्यात येणारे घटक-

1. एकात्मिक पिक व्यवस्थापन (ICM) आद्यरेषीय प्रात्यक्षिके

2. आंतरपीक पद्धतीची आद्यरेषीय प्रात्यक्षिके

3. कपाशीच्या सरळ वाणांच्या अतीघन लागवडीच्या चाचण्या (HDPS)

4. पिक संरक्षण औषधे व बायो एजंटसचे वितरण

5. राज्यस्तरीय प्रशिक्षण (अधिकारी व कर्मचारी)

पिक प्रात्यक्षिके-       
पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसाराचे साधन म्हणून पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन शेतकरी यांच्या शेतावर करण्यात येते. 
· यासाठी गावातील शक्यतो सलग 10 हेक्टर चे क्षेत्र निवडण्यात येते. या 10 हेक्टर क्षेत्रातील शेतकरी यांचा समूह/गट करण्यात येतो. 
· या 10 हेक्टर क्षेत्रात किमान 10 शेतकरी असणे आवश्यक आहे. 
· प्रती शेतकरी किमान 0.40 हेक्टर व जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्र मर्यादेत लाभ देण्यात येतो. 
· पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत घेण्यात येणारे शेतकरी शेतीशाळा संलग्न प्लॉट वर सदर प्रात्यक्षिके घेण्यात येतात. 
· सुधारित तंत्रज्ञानाचा वापर (सुधारित बियाणे, खते, औषधे इ .) या प्रात्यक्षिक क्षेत्रात करण्यात येतो. प्रात्यक्षिक प्लॉट शेजारीच पारंपारिक पद्धतीवर आधारित तुलनात्मक प्लॉट घेण्यात येतो. 
· महाबिज/राष्ट्रिय बीज निगम/केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर/ यांचेकडील प्रमाणीत/सत्यप्रत बियाणे यासाठी वापरण्यात येते. 
· तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राज्यातील कृषी विद्यापीठे यांनी तयार केलेल्या मान्यताप्राप्त बी.टी.कापसाचे सरळ/संकरित वाण प्रात्यक्षिकांमध्ये वापरता येतात.

घटक

1. एकात्मिक पिक व्यवस्थापन (ICM) आद्यरेषीय प्रात्यक्षिके – 

यासाठी प्रती हेक्टर रु.8000 इतके अर्थसहाय्य आहे. यामध्ये रु.7000 निविष्ठां साठी व रु.1000 आकस्मिक खर्चासाठी आहे. 

 2. आंतर पीक पद्धतीची आद्य रेषीय प्रात्यक्षिके (कापूस पिकात मूग,उडिद)

यासाठी प्रती हेक्टर रु.8000 इतके अर्थसहाय्य आहे. यामध्ये रु.7000 निविष्ठांसाठी व रु.1000 आकस्मिक खर्चासाठी आहे. 

 3.कपाशीच्या सरळ वाणांच्या अतीघन लागवडीच्या चाचण्या (HDPS)

पावसाची अनियमितता, पावसातील खंड, हलक्या व उथळ जमिनीत कापूस लागवड या पार्श्वभूमी वर ब्राज़ील तंत्रज्ञानावर आधारीत देशी कापसाच्या अतीघन लागवडीची पद्धत अधिक उपयुक्त ठरत आहे. रु.10000 प्रती हेक्टर इतके अर्थसहाय्य असुन त्यापैकी रु.1000 हे आकस्मिक खर्चासाठी उपलब्ध आहे.

 4.पिक संरक्षण औषधी व बायो एजंटसचे वितरण-

 ही बाब बीटी व नॉन बीटी दोन्ही प्रकारच्या कापुस पिकाला लागू आहे. यामध्ये बीज प्रक्रिया (carbendazim), पिक संरक्षण औषधे, कामगंध सापळे इ .साठी अर्थसहाय्य देय आहे.  खर्चाच्या 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर  इतके अर्थ साह्य देय आहे.याबाबतची कार्यवाही क्रॉपसॅपच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येते.                 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-व्यापारी पिके अंतर्गत ऊस विकास कार्यक्रम  2020-21

ऊसाच्या उत्पादन खर्चात कपात करुन उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या 14 जिल्हयांमध्ये योजना राबविण्यात येते. 

राबविण्यात येणारे घटक-

1)      एक डोळा पध्दतीचा अवलंब करुन आंतरपीकाची प्रात्यक्षिके आयोजित करणे

2)      ऊती संवर्धित रोपे तयार करुन अनुदानावर वाटप करणे.

पिक प्रात्यक्षिके- 

       पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसाराचे साधन म्हणून पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन       शेतकरी  यांच्या शेतावर करण्यात येते.       यासाठी गावातील शक्यतो सलग 10 हेक्टर चे क्षेत्र निवडण्यात येते. या 10 हेक्टर क्षेत्रातील शेतकरी यांचा समूह/ गट करण्यात येतो.

  1. घटक

1)       एक डोळा पध्दतीचा अवलंब करुन आंतरपीकाची प्रात्यक्षिके आयोजित करणे

यासाठी प्रती हेक्टर रु.9000 इतके अर्थसहाय्य आहे. यामध्ये रु.8000 निविष्ठांसाठी व रु.1000 आकस्मिक खर्चासाठी आहे. 

2)      ऊती संवर्धित रोपे तयार करुन अनुदानावर वाटप करणे.

   दर्जेदार बेण्याच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी वसंतदादा साखर संस्था व इतर संस्था यांच्या  मार्फत उती संवर्धित बेणे निर्मिती करण्यात येते. यासाठी रु. 3.50/- प्रति रोप अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते .

Related Posts

MHGR|  Mud Crab or Mangrove Crab खेकडा संवर्धनासाठी सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जातीस प्राधान्य द्या

Spread the love

Spread the love खेकडा संवर्धन हे तलावामध्ये, तसेच पिंजरा पद्धतीनेदेखील करता येते. निमखाऱ्या पाण्यामध्ये सिल्ला सेरेटा आणि सिल्ला ट्रॅक्‍युबेरिका या जाती चांगल्या आहेत. सिल्ला सेरेटा रंगाने तपकिरी…

“अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत”

Spread the love

Spread the love अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक…

पोकरा अंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह अनुदान माहिती

Spread the love

Spread the love Maharashtra GR: “What is Pokara Shednet House/Plastic Tunnel / Harit Anudan ? नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Spread the love

Spread the love गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना  शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात,…

फलोत्पादन यांत्रिकीकरण

Spread the love

Spread the love फलोत्पादन यांत्रिकीकरण योजनेची प्रमुख उद्ष्टिे :- Telegram Group Join Now    शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे.    शेतीच्या यांत्रीकीकरणास प्रोत्साहन देणे.    फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे.    फलोत्पादन पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.    घटकाचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी     लाभ घेण्यासाठी…

अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका)

Spread the love

Spread the love राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य (मका) राष्ट्रिय अन्नसुरक्षा अभियान- भरडधान्य (मका) हे अभियान मका या पिकासाठी  राज्यातील ७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी अर्थ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *