भारतीय दंड संहितेत कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.
यामध्ये प्रामुख्याने एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, या प्रकाराला विनयभंग असं म्हटलं जातं.
विनयभंगाच्या बाबतीत अनेक उप-कलमांचाही कायद्याचे जाणकार उल्लेख करतात.
ज्येष्ठ वकील असीम सरोदे सांगतात, “कलम 354 अंतर्गत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास 1 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
कलम 354-अ अंतर्गत, एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणे, याचा समावेश विनयभंगामध्ये होतो. यापद्धतीचा गुन्हा शिक्षा झाल्यास 3 वर्षांची शिक्षा होते.
कलम 354-ब अंतर्गत, एखाद्या महिलाचा विनयभंग करण्यासाठी तिच्यावर हल्ला केल्यास आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 4 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.”
“विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये तक्रारदार स्त्रीला व्यक्तिगतरित्या काय वाटलं, यावर खूप काही अवलंबून असतं. पण, आव्हाड यांच्या प्रकरणाचा व्हीडिओ सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. त्यामुळे इतरांना काय वाटलं, तेसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं.
गर्दीत एखाद्याला बाजूला सारण्यासाठी नुसतं अंगाला हात लावणं म्हणजे विनयभंग होत नाही.”
“एखाद्या स्त्री किंवा पुरुषास लज्जा उत्प्नन होईल, असं वर्तन करणे म्हणजे विनयभंग करणे होईल.
“एखाद्या स्त्रीस जबरदस्ती करणे, सदर घटनेत पुरुषानं स्त्रीसोबत केलेले वर्तन तिला लज्जा उत्प्नन्न करणारे आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारे होते, हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे.
“विकृत स्पर्श करणे, चोरून नजर ठेवणे, त्यापद्धतीनं बोलणे, कामूक भावनेने बोलणे किंवा तसा टोमणा मारणे, मन दुखावेल असे बोलणे किंवा कृती करणे, याला विनयभंग म्हणता येईल.
“एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा करणे, एखादी गोष्ट किंवा वस्तू दाखवणे, महिलेच्या खासगीपणाचे उल्लंघन करणारे वर्तन करणे, अंगविक्षेप करणे, एकसारखे अश्लील शब्द वापरणे अशा गोष्टी विनयभंगाखाली येऊ शकतात.”