_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र 2022 - MH General Resource

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र 2022

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र 2022

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र या आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी भव्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी घराचे २६९ चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्ट्याने अमलात आणली गेली आहे. या आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय पात्र आहे आणि त्यांना लाभ दिला जातो. आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येते.

Telegram Group Join Now

आदिवासी घरकुल योजना उद्दिष्ट्य काय?

शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी पक्की घरे नाहीत, त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देणे. आदिवासी लोक हे मातीच्या घरात, झोपडित आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळते. सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. तसेच मनरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध होतोत.

शबरी आवास योजना शासन निर्णय GR दिनांक १६ जुलै २०२१

शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक १६ जुलै २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल, हे ठरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याचे शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत किती उद्दिष्ट आहे, आणि आपल्या जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन २०२१-२२ उद्दिष्ट किती आहे ते तपासा.

शबरी आदिवासी आवास योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे?

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख, नगर परिषदांसाठी दीड लाख आणि महानगरपालिकासाठी दोन लाख असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसावे.
  • पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्यासाठी जमिन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
  • निराधा,र दुर्गम भागातील आदिवासी, विधवा या लाभार्थ्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.

शबरी आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जागेचा सातबारा उतारा आणि ७-अ प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा
  • जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र
  • ग्रामसभेचा ठराव
  • तहसिलदाराकडील उत्पन्न प्रमाणपत्र

१०३ कोटी प्रधानमंत्री आवास योजना 2021 महाराष्ट्र वितरित अर्ज कागदपत्रे पात्रता माहिती

शबरी आवास योजनेअंतर्गत किती रक्कम मर्यादेपर्यंत लाभ देय आहे?

  • ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये १ लाख ३२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.
  • नक्षलग्रस्त तसेच डोंगरा क्षेत्रासाठी १ लाख ४२ हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल.
  • महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा रुपये २ लाख एवढी असेल.

शबरी आवास योजनेकरीता संपर्क कुठे करावा?

शबरी आवास योजना अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पत्त्यावर संपर्क करावा आणि या योजने संबंधित अधिक माहिती मिळवावी.

Related Posts

सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात बंधपत्र “अ”| Option Form Regarding Direct Recruitment

सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात बंधपत्र “अ”/ Option Form Regarding Direct Recruitment  Telegram Group Join Now

राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र | Charge Transfer Certificate

राजपत्रित अधिकाऱ्यांचे कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र | Charge Transfer Certificate Telegram Group Join Now

Maharashtra Lipik Exam: Application Form

Maharashtra Lipik Exam: Application Form Telegram Group Join Now

Maharashtra Lekha Lipik Exam: M.A.C. Application Form

How to Free ISM V6.2 Download : Devanagari देवनागरी : Indian Language

Since 1991, the ISM range of software, from C-DAC GIST has been providing the state of the art Indian language edge to existing as well as custom…

The Land Revenue Rules, 1921 | Record of Rights| Power And Duties of Officers | In government official language | सरकारी अधिकृत भाषेत

The Land Revenue Rules, 1921 | Record of Rights| Power And Duties of Officers | F.G.H. Anderson | Maharashtra Land Revenue MANUAL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *