ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 76 फार्मास्युटिकल कंपन्यांची तपासणी केल्यानंतर कारवाई करण्यात आली.
औषधांच्या निकृष्ट दर्जाच्या कारणावरून केंद्र सरकारने 18 फार्मा कंपन्यांचा परवाना रद्द केला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 76 फार्मास्युटिकल कंपन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. निकृष्ट दर्जाच्या औषधांसाठी २६ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
वृत्तानुसार, केंद्राने तीन औषध कंपन्यांची उत्पादन निर्मितीची परवानगीही रद्द केली आहे.
सूत्रानुसार, केंद्र आणि राज्यांनी हाती घेतलेल्या संयुक्त ऑपरेशनच्या परिणामी ही कारवाई झाली, जिथे 20 राज्यांमधील फार्मा कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ औषधाचे उत्पादन थांबवण्यासाठी आणि देशभरातील औषधांच्या चांगल्या उत्पादन पद्धती (GMP) सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती.