_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee Maharashtra GR: Avalon Technologies IPO इलेक्ट्रॉनिक कंपनीचा आयपीओ 3 एप्रिलला होणार खुला - MH General Resource Maharashtra GR: Avalon Technologies IPO इलेक्ट्रॉनिक कंपनीचा आयपीओ 3 एप्रिलला होणार खुला - MH General Resource

Maharashtra GR: Avalon Technologies IPO इलेक्ट्रॉनिक कंपनीचा आयपीओ 3 एप्रिलला होणार खुला

Avalon Technologies IPO : एव्हलॉन टेक्नोलॉजीजचा (Avalon Technologies) आयपीओ एप्रिलला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदार 6 एप्रिलपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतील. कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून 865 कोटी रुपये उभे करायचे आहेत. या आयपीओची साीज आधी 1,025 कोटी होती, जी आता कमी करण्यात आला आहे. प्री-आयपीओ प्लेसमेंटमुळे आयपीओची साईज कमी करण्यात आली आहे. याअंतर्गत 320 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) 545 कोटीच्या शेअर्सची विक्री केली जाईल.

Telegram Group Join Now

ओएफएसचा भाग म्हणून कुन्हामेद बिचा 131 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. तर, टीपी इम्बीचम्मद 16 कोटी, मरियम बिचा 10 कोटी आणि आनंद कुमार आणि लुकुमन वीदु एडियानम प्रत्येकी 75.50 कोटी आणि सेशु कुमार 65 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील.

अँकर गुंतवणूकदार 31 मार्चपासून बोली लावू शकतील. 12 एप्रिलला शेअर्सचे ऍलॉटमेंट होईल, असे कंपनीने म्हटले आहे. त्याच वेळी कंपनी 18 एप्रिलला मार्केटमध्ये डेब्यू करेल.

कंपनी या फ्रेश इश्यूमधून 145 कोटी एव्हलॉन टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. ऍवलॉन टेक्नॉलॉजीजवर जानेवारी 2023 पर्यंत कंसोलिडेटेड आधारावर 324.12 कोटीचे कर्ज आहे. याशिवाय कंपनीला वर्किंग कॅपिटलसाठी 90 कोटी रुपये वापरायचे आहेत.

एव्हलॉन टेक्नॉलॉजीज ही एक फुल्ली इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (EMS) कंपनी आहे. त्याची स्थापना 1999 मध्ये झाली. एव्हलॉन इतर कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा देते. त्याचे अमेरिका आणि भारतात 12 मॅन्युफॅक्चरींग प्लांट्स आहेत.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *