सूचना : लेखातील मजकूर प्रौढांसाठीचा आहे.
पाळीदरम्यान सेक्स हा विषय भारतीय समाजात कदाचित अगदी विचित्र वाटणारा असू असतो. पण पाश्चिमात्य देशांमध्ये यासंदर्भात संशोधन सुरू आहे. पाश्चिमात्य माध्यमांमध्ये याविषयी अनेक वेळा लिहिलं बोललं जातं. बीबीसी थ्रीच्या लेखिका एल. ग्रिफिथ यांनी यासंदर्भात लिहिलेलं हे मनोगत इथे देण्याचा उद्देश भारताबाहेरच्या जगात स्त्रिया याविषयी किती आणि कशा पद्धतीनं व्यक्त होत आहेत याची माहिती देणे हा आहे.
मासिक पाळीदरम्यान शरीरसुखाचा आनंद घ्यावा की नाही यासंदर्भात अनेक प्रवाद आहेत. शास्त्रीयदृष्ट्या यात काहीच वावगं नसल्याचं स्पष्ट होतंय. काय आहे हा विषय? पाळीदरम्यान सेक्स शारीरिक वेदना कमी करणारा असू शकतो का?
पलंगावर पडताच मला स्वत:ला सुखाच्या परमोच्च बिंदूवर असल्यारखं वाटलं.तृप्त झाल्यासारखं वाटलं. आयुष्यात अनेकदा सेक्सचा निखळ आनंद लुटला आहे. पण या अनुभवाचं गहिरेपण मला नि:शब्द करतं.
मी आणि माझा बॉयफ्रेंड आम्ही गेले सहा महिने एकत्र आहोत आणि नुकताच अख्खा वीकेंड आम्ही एकमेकांच्या सहवासात व्यतीत केला. त्यावेळचा हा अनुभव. हे वरचं सगळं वाचून तुम्हाला ‘हनीमून सेक्स’सारखा अनुभव वाटत असेल. पण या सगळ्यामध्ये तुम्ही एका तपशीलाची अपेक्षा केली नसेल. त्या अत्युच्य आनंदाच्या काळात माझी मासिक पाळी सुरू होती.
पाळीदरम्यान सेक्स करण्याबाबत मी सुरुवातीला साशंक होते. पौंगडावस्थेत आणि वयाच्या विशीत, पाळीमुळे महिन्यातील एक आठवडा संभोगापासून दूर राहावं लागत असे. दहा वर्षांपूर्वी पाळीच्या दिवसातही माझा पहिला बॉयफ्रेंड सेक्ससाठी आतूर झालेला असायचा. पण माझ्यासाठी ते सगळं तेव्हा कठीण असायचं.
आता 2018 साल सुरू आहे. आता या वयात मला सेक्समधून नेमका काय आनंद मिळतो याचा मला आत्मविश्वास आला आहे. मासिक पाळीदरम्यान सेक्स करावा या विचाराची मी आता पक्की समर्थक झाली आहे. वाढतं वय आणि आत्मविश्वासासह सेक्सविषयीच्या अपेक्षा स्पष्ट झाल्याने मला आता पाळीदरम्यान सेक्ससाठी संकोच वाटत नाही.
अभ्यास काय सांगतो?
मला हळूहळू उमगलं की सेक्स मला मनापासून आवडतो आहे. मासिक पाळीदरम्यान सेक्सही मला आवडू लागला आहे. अनेकदा तर पाळीदरम्यान सेक्स मला फारच आनंददायी अनुभव वाटला.
मला लक्षात आलं आहे की, असं वाटणारी मी एकटीच नाही. एका संशोधनानुसार, 500 लोकांपैकी 55 टक्के महिलांनी मासिक पाळीदरम्यान सेक्स हा अनुभव अगदीच नैसर्गिक आणि अनोखा असल्याचं सांगितलं.
मात्र 45 टक्के महिलांना हा अनुभव फारसा भावलेला नाही. मासिक पाळीदरम्यान सेक्स याविषयावर पुरेसं संशोधन झालं आहे. या संशोधनानुसार 45 टक्के महिलांना पाळीदरम्यान सेक्स करताना अधिक उत्तेजित वाटतं असं स्पष्ट झालं आहे.
मात्र एवढा अभ्यास होऊनही याविषयावर संशोधक ठोस असा निष्कर्ष काढू शकलेले नाहीत.
सेक्सची इच्छा
28 वर्षांच्या कॅथरीने तिचा अनुभव मला सांगितला. पाळीदरम्यान सेक्स करावंसं वाटण्याची इच्छा अन्य दिवसांच्या तुलनेत अत्यंत वेगळी असते. काही गोष्टी अगदीच संवेदनशील असतात. या काळात सेक्स करण्याबाबत मी उतावीळ नसते. सेक्सदरम्यानच्या वेगवेगळ्या पोझिशन्सबाबत मी आग्रही नसते. पण या काळात सेक्सची गरज खूप आतून जाणवते. ती शारीरिकपेक्षा मानसिक गरज असल्यासारखं वाटतं. सेक्समधून कंफर्ट मिळतो.
पाळीदरम्यान प्रत्येक स्त्रीच्या भावना वेगवेगळ्या असतात. काही महिलांना पाळीच्या वेळी आराम करावासा वाटतो. पण यासंदर्भात विज्ञान काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या स्त्रीरोग विशेषतज्ज्ञ रचेल न्यूमन यांच्याशी संवाद साधला. जेव्हा शरीरसंबंध होतो तेव्हा शरीरातून ऑक्सिटॉक्सिन बाहेर पडतं. याचा इतर हार्मोनशीही संबंध असतो.
प्रसूतीकाळात गर्भाशय आकुंचन पावून वेदना कमी होण्यासही हे हार्मोन उपयुक्त ठरतं. याच उपयुक्ततेच्या नियमानं या हार्मोनच्या स्रवण्यानं पाळीदरम्यान क्रँप येणं कमी होऊ शकतं. म्हणजेच पाळीदरम्यान शरीरसंबंध झाले तर पाळीदरम्यानच्या वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.
जर तुम्ही शरीरसुखातून परमोच्च आनंद मिळवू शकलात तर शरीर हलकं होतं आणि शांत वाटतं. चांगले हार्मोन्स स्रवतात आणि यामुळे पायात गोळे येणं, पोट- कंबर दुखणं असा कुठलाच त्रास होत नाही.
क्लू नावाच्या पीरिअड ट्रॅकिंग अॅपसाठी कार्यरत शास्त्रज्ञ आणि संशोधक अॅना ड्रुएट यांच्या मते पाळीदरम्यान क्रँम्प्समुळे वेदना होतात आणि अस्वस्थ वाटतं. शरीरसंबंधावेळी शरीरातून बाहेर पडणाऱ्या इंड्रोफिन्स हार्मोनमुळे पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका होते. पाळीदरम्यान सेक्स अशास्त्रीय नाही
रचेल यांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्यानं रक्तस्रावाचा धोका कमी होऊ शकतो. ज्या महिला पाळीदरम्यान नियमितपणे सेक्स करतात त्यांच्या पाळीचा कालावधीही कमी होतो.
त्या पुढे म्हणतात, “पाळीदरम्यान सेक्स सोपा आणि सुलभ असायला हवा. पाळीदरम्यान सेक्स करताना तुम्ही खूप सारे प्रयोग करत बसण्यात अर्थ नाही. नाहीतर बेडरुम एखाद्या क्राइम सीनसारखी दिसेल.”
सेक्सच्या संदर्भात प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. ऐकीव माहितीवर गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही. पण मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते की पाळीदरम्यान सेक्स म्हणजे काही विचित्र नाही.