एमपीएल प्लास्टिकचे शेअर्स बीएसईवर 12.38% वाढून 17.25 रुपयांवर बंद झाले. त्यामुळेच आता हा स्टॉक मल्टीबॅगर बनला आहे, ज्याने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 103% परतावा दिला आहे.
एमपीएल प्लॅस्टिकच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 18.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत तो सुमारे 31.88 टक्क्यांनी वाढला आहे. एमपीएल प्लॅस्टिक सुमारे 21.56 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली स्मॉलकॅप प्लास्टिक कंपनी आहे.
त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 22.06 रुपये आहे तर त्याची नीचांक 5.54 रुपये आहे. कंपनीचे शेअर्स सध्या 0.24 च्या पीई रेशोवर व्यवहार करत आहेत.
एमपीएल प्लॅस्टिक ही कंपनी मिल्टन या ब्रँड नावाने व्यवसाय करते. देशातील संघटित प्लास्टिक उद्योगातील हा सर्वात जुना ब्रँड आहे. कंपनीने 1972 मध्ये आपला व्यवसाय सुरू केला. पुणे आणि सिल्वासामध्ये कंपनीचे आधुनिक प्लांट आहेत.
सुरुवातीला कंपनी टंबलर, मग, बॉक्स आणि केस यांसारखी उत्पादने तयार करत होती, आता पुढे जात त्यांनी आपला बिझनेस अपग्रेड केला आहे.
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.