Sandur Manganese Shares : शेअर बाजारात सध्या घसरण दिसून येत आहे, पण असे असले तरी काही शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. अशाच शेअर्समध्ये मोडतो संदूर मँगनीजआणि आयर्न ओर (Sandur Manganese and Iron Ore). सध्या संदुर मँगनीजच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे.
सध्या हा शेअर 13.12 टक्क्यांच्या वाढीसह 990 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी हा शेअर इंट्रा-डेमध्ये 999 रुपयांवर गेल्याचे दिसून आले. सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने (CEC) कंपनीला मँगनीजचे उत्पादन 2.86 लाख टनांवरून 5.82 लाख टनांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. यामुळेच त्याच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. (Sandur Manganese and Iron Ore shares increased read story)
संदूर मँगनीजहा भारतातील सर्वात मोठा एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण कमोडिटी उत्पादक आहे. सिस्टिमॅटिक, सेफ आणि सायंटिफिक मायनिंगचा साडेसहा दशकांहून अधिक अनुभव आहे. त्याची स्थापना 1954 मध्ये झाली.
कंपनीने आपला व्यवसाय खाणकाम तसेच फेरोअलॉय, कोक आणि उर्जेच्या उत्पादनासाठी विस्तारित केला आहे आणि पुढील विस्तार आणि विविधीकरणासाठी काम करत आहे.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक तुलनेत 20 टक्क्यांनी घसरून 400.09 कोटी झाले. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पन्न 498.45 कोटी होता. याशिवाय कंपनीचा निव्वळ नफा 108.86 कोटीवरून 62 टक्क्यांनी घसरून 41.24 कोटीवर आला आहे.
गेल्या एका महिन्यात संदूर मँगनीजचे शेअर्स 6 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 16% परतावा दिला आहे. पण, गेल्या एका वर्षातील त्याची कामगिरी जवळपास सपाट राहिली आहे आणि जवळपास 2 टक्के परतावा दिला आहे. पण गेल्या 5 वर्षांत 134.64 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.