_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee महिलासाठी विविध योजना - MH General Resource महिलासाठी विविध योजना - MH General Resource

महिलासाठी विविध योजना

नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे 2014-15 या आर्थिक वर्षात ग्रामीण क्षेत्रातील महिला, युवती यांच्यासाठी विविध योजना राबविण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित अटी व शर्तीनुसार संबंधित गटविकास अधिकारी, प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत मागविण्यात येत आहेत. या योजनांबाबतची माहिती… दहावी व बारावी उत्तीर्ण ग्रामीण महिला, मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण 
(जिल्हा परिषद उपकर, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना व आदिवासी बाह्यक्षेत्र उपयोजना अंतर्गत )

Telegram Group Join Now

कसा घ्याल लाभ…

 • संस्थेकडे एमएससीआयटी प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा. •  कमीतकमी दहावी पास असलेल्या ग्रामीण भागातील मुलीस, महिलेस प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील. प्रशिक्षणार्थींचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच, ग्रामसेवक यांचे असावे. •  प्रशिक्षणार्थीच्या पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असावे.
 • प्रती प्रशिक्षणार्थी शासनाने विहित केलेले संपूर्ण शुल्क अनुदान देण्यात यावे.
 • कमाल मर्यादा प्रती लाभार्थी 4 हजार रुपये एवढी राहील.
 • मागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी.
 • एमएससीआयटी प्रशिक्षण गतवर्षात म्हणजे सन 2013-14 मध्ये पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना चालू वर्षात या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • यावर्षातच अभ्यासक्रम पूर्ण करणारे असावेत.

महिला/मुलींना शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण (जिल्हा परिषद उपकर )

 • संस्थेकडे शिवणकाम प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.
 • ग्रामीण भागातील महिला/मुलींनाच प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील.
 • प्रशिक्षणार्थींचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • प्रशिक्षणार्थी/पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असावे.
 • प्रती प्रशिक्षणार्थी शासनाने विहित केलेले 90 टक्के शुल्क अनुदान देण्यात यावे व 10 टक्के शुल्क लाभार्थ्यांने भरणा करावे.
 • अनुदानाची कमाल मर्यादा प्रती लाभार्थी पाच हजार रुपये एवढी राहील.
 • मागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी. 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरवणे (जिल्हा परिषद उपकर, विशेष घटक योजना,आदिवासी क्षेत्र उपयोजना व आदिवासी बाह्यक्षेत्र उपयोजनेअंतर्गत)

कसा घ्याल लाभ…

 • विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती स्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
 • जिल्ह्याचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
 • सदरील महिला ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे.
 • यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • लाभधारकांनी शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून शिलाई मशिनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
 • शिलाई मशीन विक्री/हस्तांतर न करण्याबाबतचे हमीपत्र असावे.
 • लाभधारकांस 10 टक्के लाभार्थी हिस्सा साहित्य घेताना भरणा करावा लागेल. चौथी ते दहावी शिकलेल्या ग्रामीण महिला/मुलींना कराटे प्रशिक्षण देणे ( जिल्हा परिषद उपकर ) •  संस्थेकडे कराटे प्रशिक्षणाचा शासनमान्य परवाना असावा.
 • ग्रामीण भागातील महिला/मुलींनाच प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील.
 • प्रशिक्षणार्थींचे रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • प्रशिक्षणार्थी/पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असावे.
 • प्रती प्रशिक्षणार्थी अनुदानाची कमाल मर्यादा 600 रुपये एवढी राहील.
 • स्वयंरोजगार ( विशेष घटक योजनाअंतर्गत ) •  विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीस्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
 • जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
 • सदरील महिला ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयांच्या आत असावे.
 • यापूर्वी सदरील योजनेचा लाभ घेतले नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र ग्रामसेवकांचे असावे.
 • प्रति लाभार्थी 500 रूपये अनुदान. विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अनुदान •  विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती स्तरावर विहित मुदतीच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
 • जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • विवाह नोंदणी प्रमाणपत्र ग्रामसेवकाचे असावे.
 • सदरील महिला ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजारांच्या आत असावे.
 • यापूर्वी सदरील योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवक यांचे असावे.
 • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामसेवकांचे असावे.
 • प्रति लाभार्थी 2 हजार रुपये अनुदान.

या योजनांबाबत अधिक माहिती व तपशील गटविकास अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्या-त्या तालुक्यातील इच्छूक लाभार्थी, अर्जदारांनी संबंधित तालुक्यातील या यंत्रणांशी संपर्क साधावा. 

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *