महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.
आवश्यक मंत्रिमंडळ १) पोषण २) कृषि ३)प्रवास व पर्यटन ४) लघुउद्योग ५)जड उद्योग ६)मत्स व पशुपालन ७) सार्वजनिक बांधकाम ८) संपत्ती अधिकार ९) अर्थ १०)आपत्ती व्यवस्थापन ११)राज्य अंतर्गत सुरक्षा १२)कर १३) शालेय शिक्षण १४)उच्च शिक्षण १५) नैसर्गिक साधनसंपत्ती सुरक्षा १६) पर्यावरण सुरक्षा १७) पाणी पुरवठा १६) ऐतिहासिक वारसा जतन १७) आदिवासी विकास १८) माहिती तंत्रज्ञान १९) क्रीडा व आत्मसुरक्षा २०)स्वच्छता २१) सामाजिक आरोग्य २२)कला व साहित्य प्रोत्साहन २३)आर्थिक सहाय्य २४) सामाजिक न्याय २५)शहर विकास २६) ऊर्जा निर्मिती २७) महिला व बालविकास २८) ग्रामविकास २९) कामगार विकास ३०)राज्य कार्यक्रम निर्णय—मुख्यमंत्री
मंत्रिमंडळ
१२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१]
दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्री असून त्यात ३३ कॅबिनेट मंत्री व १० राज्य मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी कमाल मंत्रीसंख्या ४३ आहे.
खाते
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, वने व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, वने व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
सहकार, पणन
शालेय शिक्षण
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
वित्त, नियोजन उत्पादन शुल्क
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
रोजगार हमी, फलोत्पादन
मृद व जलसंधारण
महिला व बालविकास
महसूल
पाणी पुरवठा व स्वच्छता
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
परिवहन, संसदीय कार्य
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
ग्रामविकास आणि कामगार
गृहनिर्माण
गृह
कृषी, माजी सैनिक कल्याण
ऊर्जा
उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
उच्च व तंत्र शिक्षण
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन, मदत व पुनर्वसन
आदिवासी विकास
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अन्न व औषध प्रशासन