हिंदू एकत्र कुटूंबाच्या मिळकतीत मुलांना वारसहक्क केव्हा व कसा येतो?
Telegram Group
Join Now
- कोणताही दस्तऐवज करताना मालकी हक्क पाहिला जातो व योग्य त्या मालकी हक्क असणाऱ्या व्यक्तीकडूनच दस्त करुन घेतला जातो.
- 22 जून 1994 रोजी हिंदू वारसा ‘महाराष्ट्र दुरुस्ती’ कायदा 1994 मध्ये प्रकरण 29 ए दाखल करणेत आले आहे. त्या दुरुस्तीप्रमाणे मुलींना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलाइतकेच हक्क प्राप्त झाले आहेत.
- हिंदू मिताक्षरी कायदया प्रमाणे एकत्र कुटुंबात पूर्वी आजोबा, वडील आणि मुलगा अशा रितीने तीन वंशज उतरत्या प्रमाणे हक्कदार असत. हिंदू मिताक्षरी कायदया प्रमाणे मुलांना मिळकतीत जन्मता हक्क असतो. म्हणूनच वाडवडीलार्जीत इस्टेटमध्ये वडील व मुलगे असतील तर वडील एकटे मालक नसतात आणि म्हणूनच एकटया वडीलांना जर कुटुंबाला कायदेशीर गरज नसेल तर मिळकत विकता येणार नाही अगर हस्तांतरण करता येत नाही. याचाच अर्थ असा की एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये आजोबा जिवंत असल्यास आजोबा व त्याची मुले व नातू हे वारस असतात.
- कोपार्सनरी मिळकत ही अविभाज्य असते हा 1956 च्या पूर्वीचा कायदा वारसासंबधी होता व कोपार्सनरी म्हणजे कुटुंबाचा घटक असणारी व्यक्ती म्हटली जाते.
- 1937 साली दि हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट हा कायदा “The Hindu Women’s Right To Property Act 1937” 14 एप्रिल 1937 आला. या कायदयान्वये प्रथमच विधवा बायकांना नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये मुलाइतकाच हक्क मिळाला.
- 17 जून 1956 रोजी दि हिंदू वारसा कायदा हिंदू सेक्शन एक्ट अंमलात आणला त्या कायदयातील कलम 6 मध्ये हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये स्त्रियांना व मुलींना केव्हा व कसे हक्क येतात, हे सांगितले गेले आहे.
- महाराष्ट्र शासनाने 22 जून 1994 रोजी मुलींना मुलाइतकाच हक्क दिला आहे. हिंदू सेक्शेशन ॲक्ट मध्ये कलम 29 ए महाराष्ट्र शासनाच्या दुरुस्तीमुळे दाखल झाले आहे. कलम 3 मध्ये दुरुस्ती करुन 22 जून 1994 एकत्र हिंदू कुटुंबाचे वाटप केले व मुलींना हिस्सा दिला नाही, तर ते वाटप रदद आणि बेकायदेशिर धरले जाते. Null And Void व ही तारीख 22 जून 94 ते नोव्हेंबर 94 ची आहे.
- कलम 19 ए प्रमाणे मुलींना मुलांइतकाच अधिकार दिला गेला आहे व मुलीला मुलासारखेच संबोधले जाईल असे म्हटले आहे.