सक्तीने वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या कृत्यांना प्रतिबंध करणेबाबत.
प्रस्तावना :-
राज्यामध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणामध्ये परराज्यातील एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तीन इसमांनी राज्यातील एका शहरात आणून कुंटणखान्यात विकून तिच्यावर देहविक्रयाची सक्ती केली. याबाबत तिने ठाम नकार दिल्यामुळे त्यांनी तिला वेदम मारहाण करुन छातीवर जखमा करुन स्तनाग्र कापून टाकल्याची घटना निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे घटना घडून गेल्यानंतर काही दिवस ही घटना संपूर्ण समाजापासून आणि शासकीय व पोलीस यंत्रणेपासून दुर्लक्षितच राहिली.
या कालावधीत त्या महिलेला कोणतीही वैद्यकीय नदतही मिळाली नाही. महिलेची विचारपूस करण्यासाठी अथवा तिला कोणत्याही प्रकारची मुदत करण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी अथवा स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधीही गेला नाही. ही बाब अतिशय गंभीर व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करावयास लादणारी आहे. तसेच सदर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालय येथे रिट पिटीशन (क्रिमिनल) क्र.६१/२०१४ विभू शंकर निश्र विरुध्द केंद्र शासन व इतर ही दाखल करण्यात आली आहे.
सदर याचिकेच्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेला आला आहे. अशाच प्रकारे देशातील तसेच राज्यातील मोठया शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु आहे अशा ठिकाणी काही कुंटणखाना चालविणारे महिला व पुरुष दलाल दुसऱ्या राज्यातून तसेच ज्यातील विविध शहरामधून महिलांना/मुलींना विविध प्रकारचे आमिष दाखवून (उदा. लग्नाचे,..
सक्तीने-वेश्या-व्यवसायास