_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/03/","Post":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/maharashtragr-forced-prostitution/%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-2/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प - MH General Resource तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प - MH General Resource

तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प

Spread the love
  1. ध्येय व उद्देश
  2. रुग्णवाहिकांचे पखरण
  3. माहिती केंद्र
  4. प्रशिक्षण
  5. डॉक्टर
  6. पथदर्शी
  7. दूरध्वनी सहायक

परिचयराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखालील तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्पामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची  आरोग्य सेवा ( जीवनदायी रुग्णवाहिका ) देण्यात येते.  त्यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेले रुग्ण, सर्व गंभीर आजार, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशु संबंधातील आजार, साथीचा रोगाचा  झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखिमीमुळे झालेले रुग्ण, गंभीर हृदयरोगी रुग्ण, सर्पदंशाचे रुग्ण, सर्व अपघात, अन्नातून विषबाधा, श्वसनाचे रोग, मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो  .राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम व महाराष्ट्रा शासन यांचे अंतर्गत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी १०८ हा दूरध्वनी क्रमांक निर्देशित करण्यात आला आहे.“गोल्डन अवर थियरी “ वर आधारित योजना –उत्सृष्ट क्रमांकाद्वारे रुग्णाला पहिल्याच तासात सर्वात जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाईल.   ही सेवा वर्षातील ३६५ दिवस व २४ x ७ उपलब्ध असेल व रुग्णांना मोफत पुरविण्यात येईल.रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या साथी, गंभीर आजार व तदनुषंगिक समस्या, ह्या तातडीच्या परिस्थिती शिवाय गरोदर स्त्रिया व नवजात बालके यांच्याशी निगडीत तातडीची परिस्थिती सुद्धा हाताळली जाईल.तातडीच्या प्रतिसादात्मक सेवांमध्ये संगणक तंत्रज्ञानाचे एकीकरण, ध्वनी नोंद प्रणाली, भौगोलिक माहिती प्रणाली ( GIS), भौगोलिक स्थिती प्रणाली ( GPS), स्वयंचलित वाहन ठावठिकाणा प्रणाली (AVLT), व फिरती दळणवळण सेवा (MCS), यांचा समावेश असेल.रुग्णावाहीकांमध्ये प्रगत जीवनाधार प्रणाली, म्हणजेच ALS  व प्राथमिक जीवनाधार प्रणाली, म्हणजेच  BLS ने सुसज्ज असतीलनिविदेच्या कागदपत्रांमध्ये मध्ये देण्यात आलेल्या  यादीनुसार व विनिर्देशानुसार सेवा पुरवठादारास ALS व  BLS प्रणाली असलेल्या रुग्णवाहिकेत वैद्यकीय उपकरणे पुरवावी लागतील.ह्या वैद्यकीय उपकरणांमध्ये रुग्णवाहिकेतील खाट, स्कूप स्ट्रेचर,  रेकॉर्डर  सहित बाय-फेझिक डेफिब्रीलेटर कम कार्डीयाक मॉनिटर, ( फक्त ALS करिता ). ट्रान्स्पोर्ट व्हेंटिलेटर, ( फक्त ALS करिता ), पल्स ऑक्सिमीटर ( फक्त BLS करिता ), सक्शन पंप, प्राणवायूचा सिलिंडर इत्यादीचा समावेश असेल.ही रुग्णवाहिका वैद्यकीय कर्मचारी व प्रशिक्षित चालक असलेल्या आणीबाणीतील वैद्यकीय तंत्रज्ञाकडून परीचालीत केल्या जातील.

Telegram Group Join Now

ध्येय व उद्देश

जीव वाचविण्यासाठी प्राथमिक मदत करणे, पुढील नुकसान टाळणे व बरे होण्यासठी मदत करणे,.महाराष्ट्रातील कुठल्याही नेटवर्क मधून तीन अंकी मोफत क्रमांकावर दूरध्वनी करून २४ X ७ उपलब्ध असणारी तातडीची प्रतिसादात्मक सेवा उपलब्ध करून देणे.तातडीच्या परिस्थतीत सर्व गरजूंना  बहुव्यापक सेवेचा लाभ देणारी प्रणाली निर्माण करणे..मृत्यूसंख्येत व रोगटपणा मध्ये २०% घट अपेक्षित .

रुग्णवाहिकांचे पखरण

महाराष्ट्र तातडीच्या वैद्यकीय सेवेद्वारे सर्व राज्यात ९३७ रुग्णवाहिका पुरविल्या जातील.  .राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेद्वारे ६९० ग्रामीण भागासाठी ६९० रुग्णवाहिका पुरविण्यात येत असून  महाराष्ट्रा शासनाने मुंबई, पुणे , ठाणे, पिंपरी चिंचवड, नासिक, औरंगाबाद व नागपूर महानगरपालिकांसाठी अतिरिक्त २४७ रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत.दुसऱ्या टप्प्यातील रुग्णवाहिकांची खरेदीअनुक्रमांकवर्षराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनामहारष्ट्र शासनएकूण ALSBLSएकूणALSBLSएकूणALSBLSएकूण १ २०१३-१४ ८६ २५९ ३४५ ३० ९३ १२४ ११७ ३५२ ४६९ २ २०१४-१५ ८६ २५९ ३४५ ३० ९३ १२३ ११६ ३५२ ४६८ एकूण १७२ ५१८ ६९० ६१ १८६ २४७ २३३ ७०४ ९३७

माहिती केंद्र

चेस्ट रुग्णालय औंध पुणे येथे केंद्रीकृत नियंत्रण कक्ष उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे..ह्या माहिती केंद्रातून जीपीएस – जीआरपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णवाहिकांचा ठावठिकाणा दिला जाईल.तातडीचे दूरध्वनी घेणारे व प्रतिसाद पाठवणारे प्रशिक्षित कर्मचारी २४ X७ तास उपलब्ध असतील.ह्या माहिती केंद्रातून दैनिक, साप्ताहिक व मासिक व्याव्यास्थापन माहिती प्रणाली (MIS ) अहवाल प्रस्तुत केले जातील.पुण्यामध्ये ६० जागा असलेले माहिती केंद्र असेल.

प्रशिक्षण

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाईल.तातडीच्या प्रतिसाद सेवेसाठी रुग्णवाहिका चालकांना प्रशिक्षण दिले जाईल.तातडीच्या वैद्यकीय सेवा कार्यान्वित करण्यासाठी दूरध्वनी घेणारे व प्रतिसाद पाठवणारे कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येईल.तीन पाळ्यांमध्ये २४ x ७ उपलब्ध असणारा १०८ रुग्णवाहिका कर्मचारी वर्ग

डॉक्टर

अर्हता  बीएएमएस दिलेले प्रशिक्षण  ALS (प्रगत जीवनाधार प्रणाली )  BLS (प्राथमिक जीवनाधार प्रणाली )  अरिष्ट  व्यवस्थापन इत्यादी />प्रशिक्षणाचा कार्यक्रम  प्रत्येक तुकडीसाठी १८ दिवस एकूण डॉक्टर्स ३२८०( अंदाजे)

पथदर्शी

अर्हता शासनाच्या नियमानुसार जड वाहनाचा चालक दिलेले प्रशिक्षण  वाहनाच्या सुरक्षिततेचे नियम, रुग्णवाहिका चालविण्याची तंत्रे, अपघात टाळणे व झाल्यास करावयाची प्रक्रिया, Vehicular Safety Checks, Ambulance Driving Techniques, Accident Avoidance & Crash Procedures, प्राथमिक जीवनाधार प्रणाली व  अरिष्ट  व्यवस्थापन  प्रोटोकॉल चालकाचे प्रशिक्षण प्रत्येक तुकडी ७ दिवस एकूण चालक ३२८० (अंदाजे )

दूरध्वनी सहायक

अर्हता  कुठलाही पदवीधरदिलेले प्रशिक्षण

संवाद अधिकारी –

जावक प्रणालीमधील प्राथमिकता, व दळणवळणातील गरज , प्रोटोकॉल अनुदेश व संवाद अधिकाऱ्याची भूमिका – परिचालन, कायदेशीर बाबी, व गुणवत्ता सुधारणा जावक अधिकारी – प्राथमिक रवानगीचे तंत्रज्ञान, नैतिक व वैद्यकीय बाबी, जीवनाधार प्रणाली पुरविणे सहायकाचे प्रशिक्षण प्रत्येक तुकडी ७ दिवस एकूण दूरध्वनी सहायक २३६ (अंदाजे )रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी, तातडीचे डॉक्टर, वैद्यकीय नियंत्रण, पर्यवेक्षक , प्रशासकीय कर्मचारीवर्ग यांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

Spread the love

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

Spread the love

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

Spread the love

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

Spread the love

Spread the love What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी…

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Spread the love

Spread the love Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

Spread the love

Spread the love आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *